पंंढरपूर (प्रतिनिधी) : वारीमध्ये चंद्रभागेवरील दगडी पूल च नवीन पूल वाहतुकीसाठी कमी पडत असल्याने येत्या आषाढी यात्रेत प्रयागराजच्या धर्तीवर चंद्रभागेवर तात्पुरते पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच दिली होती. आता याला आदिवासी महादेव कोळी समाजाकडून तीव्र विरोध होतोय. यासंदर्भात आज आदिवासी महादेव कोळी समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी होडी चालक मालक कल्याणकारी संघ या संघटनेच्या वतीने पंंढरपूर प्रांत कार्यालय, पंंढरपूर तहसिल कार्यालय, पंंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पंंढरपूर शहर पोलिस ठाणे, पंंढरपूर नगरपरिषद व लघु पाटबंधारे कार्यालय आदी सर्व ठिकाणी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
जे तीन पुल उभारण्यात येणार आहेत त्यामुळे आमचे जीवन उध्दवस्त होणार आहे, कारण आमचा उदरनिर्वाह ज्या होडी व्यवसायावर चालतो तोच आपण बंद करणार आहात, असे निर्णय घेऊन जर आमच्या समाजावर अन्याय करत असाल तर यास आमचा तीव्र विरोध आहे.
तातडीने हा निर्णय बदलला नाही तर दिनांक ५ में पासुन अर्ध नग्न आंदोलन, धरणे आंदोलन, जलसमाधी आंदोलन असे विविध प्रकारचे उग्र आंदोलने आम्ही करू. असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी संघटनेचे आदिवासी महादेव कोळी जमातीच्या न्याय हक्कासाठी लढणारे समाजसेवक गणेश अंकुशराव, सोमनाथ अंभगराव गणेश तारापुरकर, अमर पंरचंडे, चंद्रकांत अभंगराव, अनिल अधटराव सचिन नेहतराव ,सुरज कांबळे पुंडलिक पंरचंडे आप्पा करकमकर समाजसेविका दुर्गाताई माने यांच्यासह अनेक होडीचालक, मालक व आदिवासी महादेव कोळी समाजाचे तरुण मंडळी उपस्थित होते.
..............................................
मा. संपादक पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिक, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक मिडीया, युट्यूब न्युज चॅनल वेब पोर्टल वर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.🙏
कळावे आपला
- गणेश अंकुशराव
- मोबाईल - 9370271730
0 Comments