सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुका गावभेट दौऱ्यानिमित्त सय्यद वरवडे येथे नागरिकांच्या गाठी भेटी घेत संवाद साधला. ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले.
तसेच यावेळी सय्यद वरवडे येथील कॅनलची पाहणी केली कॅनल वरचा रस्ता वळणाचा असल्यामुळे नेहमीच अपघात घडतात अशी माहिती ग्रामस्थानी दिली असता कॅनल वरचा रस्ता सरळ करण्याचे सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
या गावभेट दौऱ्यात मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, सरपंच वाल्मीक निळे, मा सरपंच टिपुलाल मुजावर, अशोक भोसले, विश्वनाथ साबळे, जब्बार पटेल, लतिफ मुलानी, शहाजी माने, मिलिंद कुचेकर, ग्रामसेवक माळी मॅडम, साजिद पाटील, संजय कोरे, दाजी वाघमोडे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला भगिनी, युवा सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments