LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*प्राचार्य शिवाजीराव बागल - यशवंतराव चव्हाण.. पुरस्काराने सन्मानित*



 'श्री शिवांजली फाऊंडेशन मलकापूर-कराड' मार्फत दिले जाणारे 'यशवंतराव चव्हाण  कृष्णाकाठभूषण दीपस्तंभ गौरव पुरस्कार' वितरण समारंभ शनिवार दि.२६/०४/२०२५ रोजी 'वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह शिवाजीनगर - कराड' येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी पंढरपूरचे प्राचार्य शिवाजीराव बागल यांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्य निर्मिती बद्दल राज्यस्तरीय अत्यंत प्रतिष्ठेचा "यशवंतराव चव्हाण कृष्णाकाठ कृतज्ञता दीपस्तंभ गौरव पुरस्कार सन-२०२५-२६" प्रमुख पाहुणे श्रीमती सरोज एन. डी. पाटील (माईसाहेब), साहित्यिक - व्याख्याते किसनराव कुराडे सर, श्री द्रोणागिरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष - डॉ. डी. पी. खाडे सर यांचे शुभहस्ते मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, गुळाची ढेप, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष- आर.एस.चोपडे, स्वागताध्यक्ष - प्रवीणकुमार जगताप, नामदेव पडवळे, मेजर प्रा. प्रशांत कदम, जे. के. बापू जाधव, अध्यक्ष -  दादा श्रीराम सुर्वे, निमंत्रक - प्रा. डॉ. हणमंतराव कराळे - पाटील उपस्थित होते. प्राचार्य  बागल यांना यापूर्वी अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments