LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर प्रतिनिधी दि.09 - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य करणारा पक्ष असून सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबुत करणेसाठी ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरेामणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले.


 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ पंढरपूर येथील कल्याणराव काळे जनसंपर्क कार्यालय येथे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे  सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक, पंढरपूर शहर अध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी सर्व सामान्य जनतेला आपला केंद्र बिंदु मानून हिताचे धोरणात्मक निर्णय घेतले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्ष संघटन मजबुत करणेसाठी ग्रामीण भागातील प्रत्येक वाडी वस्तीवर सदस्य नोंदणीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नोंदणी करुन सर्व समान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा पोहोच करणार असल्याचे सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रसेचे जिल्हाध्यक्षा वर्षाताई शिंदे यांनी सांगीतले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक, शहर अध्यक्ष दिगंबर सुडके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करुन पक्ष बळकटी व संघटनात्मक करीता प्रभावीपणे बुथवाईज यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचे सांगीतले.

            यावेळी काँग्रेस महिला कार्याध्यक्ष उज्वला पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सौ.किरम मोहिते, सौ.नागरताई चवरे, सौ.सिमा बागल, मंगळवेढा तालुका उपाध्यक्ष रेखाताई साळूंखे, तालुका संघटक राणी सुतार, पंढरपूर शहर कार्याध्यक्षा प्रियंका सोळंकी,  तालुका कार्याध्यक्षा गितांजली कदम, सरस्वती नागटिळक, सुमन आवताडे, मिनाक्षी घोडके, प्रियंका दत्तु, काजल सातपुते, बाळाबाई डावरे,शोभा बनकर, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नारायण शिंदे, ज्योतीराम पोरे, अर्जुन जाधव, अमोल कवडे, हणमंत जमदाडे,डॉ.सुधीर शिनगारे,   स्वपनिल जमदाडे, तुकाराम झांबरे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे संचालक प्रकाश गायकवाड, बनसिध्द पुजारी, शंकर लोंढे, संजय सातपुते, अंकुश चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, गणेश पवार  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments