LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

ऊस तोडणी वाहतुक करार शुभारंभ



सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि., चंद्रभागानगर-भाळवणी, ता.पंढरपुर, जि. सोलापुर या कारखान्याचा गळीत हंगाम 2025-2026 साठी ऊस तोडणी वाहतुक करार शुभारंभ कारखान्याचे चेअरमन मा. श्री. कल्याणराव वसंतराव काळे यांचे मार्गदर्शनाखाली आज दि. 30/04/2025 रोजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.श्री. भारत (नाना) सोपान कोळेकर तसेच ऊस तोडणी वाहतुक उपसमिती चेअरमन श्री. मोहन वसंतराव नागटिळक यांचे शुभहस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक श्री. राजसिंह माने, प्र. कार्यकारी संचालक श्री.पी डी घोगरे, मुख्य शेती अधिकारी श्री. आर जे नरसाळे, शेती अधिकारी श्री. पी आर थोरात, ऊस पुरवठा अधिकारी श्री.एच आर गिड्डे व सर्व खातेप्रमुख, वाहतुक कंत्राटदार श्री.धनाजी मारुती कवडे, श्री. शंकर उद्धव डोंगरे श्री. रत्नाकर बिभीषण गायकवाड, श्री. अशोक नागन्नाथ गायकवाड, श्री. अर्जुन किसन बागल, श्री. मधुकर नामदेव ताटे, श्री. गणेश नागनाथ माने श्री. करण अर्जुन बागल बीड भागातील बैलगाडी मुकादम श्री. गोपाळ आप्पा चौरे, श्री. दत्तात्रय नवनाथ चौरे श्री. चंद्रकांत गोपाळ चौरे, ऊस उत्पादक शेतकरी व शेती विभागातील सर्व स्टाफ उपस्थित होते तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त वाहतुक ठेकेदार यांनी शेती आफिसला येवुन लवकरात लवकर करार करुन घेणेत यावेत.

Post a Comment

0 Comments