पंढरपूर (ता.01) महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त आज (गुरुवार) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
सजावटीमुळे मुळे श्रींचा गाभारा मनमोहक व आकर्षक दिसत आहे. यासाठी ब्लू डीजी 1500 गड्डी, स्टेटस 1500 गड्डी, कामिनी 1500 गड्डी, जिप्सो 100 गड्डी, ऑर्किड 5 गड्डी, जरवेरा 20 गड्डी, दस गुलाब 20 गड्डी, झेंडू भगवा 300 किलो, झेंडू पिवळा 300 किलो इत्यादी दोन टन फुलाचा वापर करण्यात आला आहे.
सदरची सजावट विठ्ठल भक्त चव्हाण परिवार धायरी गाव, पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली आहे.
0 Comments