LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५१वी जयंती साजरी



पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५१ वी जयंती साजरी करण्यात आली.
         प्रारंभी सोलापुरातील किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज् लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र गुमास्ते यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रथम वर्ष अभियांत्रीकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी आपल्या भाषणातून राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज् लिमिटेडचे व्यवस्थापकीय रवींद्र गुमास्ते म्हणाले की, ‘सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षणाचे जनक, रयतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी शाहू महाराजांनी केलेले दिव्य  कार्य, कोल्हापुर संस्थानात राधानगरी सारखे धरण बांधून सिंचनाची केलेली व्यवस्था, कला रसिक- कलाकार, कुस्तीगीर व खेळाडू यांना त्यांनी दिलेला राजाश्रय, उद्योगधंद्यांना केलेले सहाय्य, वसतिगृह आणि शिक्षणसंस्थांची उभारणी अशा अनेकविध कार्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची लोकराजा अशी ओळख निर्माण झाली. ब्रिटीश राजसत्तेचा अंमल असताना सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व सर्व समाजांच्या सामाजिक उन्नतीसाठी आपले जीवन वेचणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात शेतकरी व प्रजेच्या हितासाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या या योगदानामुळे प्रत्येक ठिकाणी सामाजिक जाणिवेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे नाव घेतले जाते. यावेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज शिवाजी महाराज मोरे, किर्लोस्करचे वरिष्ठ व्यवस्थापक ऋषिकेश कुलकर्णी, सौ. कमला गुमास्ते, पर्यावरण तज्ञ डॉ. सचिन पुणेकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्षाचे उपविभागीय अधिकारी निखिल मोरे, सौ. सुवर्ण भांगुरकर, वृक्षप्रेमी ग्रुपचे अॅड. सुनील वाळूजकर, अनंत जाधव, अमित राठोड,  स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा.ए.ए.मोटे, सर्व विभागप्रमुख, इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments