सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळी या गावाला भेट दिली. या भेटीत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, गरजा आणि विकासाच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
गावातील चारशे एकर जमीन जवळगाव प्रकल्पासाठी संपादित झाली असून आमच्या जमिनीत जाऊन सुद्धा या प्रकल्पाचा पाणी आम्हाला मिळत नाही ते मिळणं मिळवण्यासाठी आम्ही गेल्या पन्नास वर्षापासून प्रयत्न करत आहोत पण त्याला यश येत नाही तरी खासदार या नात्याने तुम्ही जवळगावच्या प्रकल्पातून कौठाळी गावाला पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा आणि तुमच्या माध्यमातून ते पाणी आम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे अशी मागणी कौठाळी ग्रामस्थांनी केली तसेच ग्रामस्थांनी या वेळी गावाला गरजेचे असलेले पाणंद रस्ते , कौठाळी गावात आरोग्य केंद्र , महिला बचत गटांना हक्काची अश्या कार्यालय, हिंदु स्मशानभूमी संरक्षक भिंत, सिमेंट काँक्रीट रस्ता महत्त्वाच्या, पिक विमा संबधित, राष्ट्रीय कृत बँकेची शाखा, अश्या कामांची मागणी केली.
या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी कौठाळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व स्तरावर पाठपुरावा करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष शरद माने, माजी सरपंच रामभाऊ माने, सुदर्शन अवताडे , वैभव घोडके,सचिन गुंड जिल्हा काँग्रेस समन्वयक मनोज यलगुलवार, शंकर मौरे, शुभम शिराळ, अंकुश घुले तसेच यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
*तिरुपती परकीपंडला (tp)*
सोलापूर शहर काँग्रेस मिडिया सेल
माझा नवीन व्हॉट्सॲप नंबर *8010505458* आपण सेव करून आपल्या ग्रुप मध्ये अँड करावा.
0 Comments