*श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवानिमित्त इस्कॉन,मंदिर पंढरपूर यांच्या वतीने आयोजित अत्याधुनिक रोबोटिक हत्तीच्या भव्य अनावरण सोहळ्याचा शुभारंभ पंढरपूर लोकनियुक्त नगराध्यक्षा मा.प्राणितीताई भालके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.*
या प्रसंगी भक्ती, संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर मिलाफ अनुभवण्याची संधी मिळाली. श्री जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा यांच्या रथयात्रेचे आध्यात्मिक महत्त्व भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा हा अभिनव उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मत नगराध्यक्षा मा.प्राणितीताई भालके यांनी व्यक्त केले.
यावेळी इस्कॉन परिवाराच्या वतीने नगराध्यक्षा मा.प्राणितीताई भालके यांचा सत्कार करण्यात आला.

0 Comments