श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीची पंढरपूर शहरात नगरपरिषद हद्दीत यमाई तलावाजवळ गोशाळा आहे. या गोशाळेतील कर्मचा-याने नवजात वासरास दुध पाजताना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने वासराचा मृत्यू झाल्याची बातमी दि.18 जुलै रोजी समाज माध्यमात प्रसिद्ध झाली होती. याशिवाय, त्याबाबतचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमात व्हायरल झाला होता.
मंदिर समितीच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले गोशाळेतील कर्मचारी योगेश सुधाकर पाठक व तानाजी रामचंद्र जाधव या दोन्ही कर्मचा-यांने 2 ते 3 दिवस वयोमान असलेल्या वासरास दुध पाजताना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने सदर नवजात वासराचा मृत्यू झाल्याचे सस्कृतदर्शनी दिसून येत आहे. याबाबत त्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरून त्यांच्या विरूध्द कायदेशीर कारवाई करण्याच्या दष्टीने गोशाळा विभाग प्रमुख पांडूरंग बुरांडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं. 2023 मधील कलम 325 व 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याशिवाय, मंदिर समितीच्या आगामी सभेत सदरचा विषय ठेवून पुढील योग्य ती कारवाई देखील नियमानुसार करण्यात येईल. यामध्ये कोणत्याही व्यक्तीस पाठीशी घातले जाणार नाही असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.
0 Comments