LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

एमसीए प्रवेशासाठीची ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा





पंढरपूर– ‘शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये एमसीए प्रवेशाकरिता आवश्यक असलेली ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सोमवार, दि. ३० जून २०२५ पासून सुरु झाली असून ही प्रक्रिया गुरुवार, दि. ९ जुलै २०२५ (सायं.५.००) पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
        राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने एमसीए ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सोमवार, दि. ३० जून २०२५ पासून ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली असून गुरुवार, दि. ०९ जुलै २०२५ (सायं.५.००) पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व निश्चिती (कन्फर्मेशन) करण्यासाठी मंगळवार, दि. ०१ जुलै २०२५ पासून ते शुक्रवार, दि.१० जुलै २०२५ (सायं.५.००) पर्यंत मुदत दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्या विद्यार्थ्यांनी ‘एमएएच- एमसीए सीईटी २०२५' ही परीक्षा दिलेली असावी. स्वेरीच्या एम.सी.ए. विभागाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. गेल्या वर्षी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नोकरीसाठी विविध पदांवर रुजू देखील झाले आहेत. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली तज्ञ प्राध्यापक वर्गाच्या सहकार्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सुविधा स्वेरीमध्ये उपलब्ध आहे. या प्रक्रियेसंदर्भात अधिक माहीतीसाठी प्रवेश प्रक्रिया विभागाचे अधिष्ठाता डॉ. करण पाटील (मोबा. नंबर–९५९५९२११५४) व एम.सी.ए.चे विभागप्रमुख प्रा. मनसब शेख (मोबा. नंबर– ९०२८९०७३६७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments