LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी युवा संवाद यात्रेचे आयोजन


 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी युवा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी दिली आहे.
  प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस पंढरपूरच्या वतीने राष्ट्रवादी युवा संवाद यात्रा अजित पर्व युवा सर्व याचे दिनांक 23 जुलै ते 30 जुलै 2025 या कालावधीत आयोजन केले जाणार आहे.
 या संवाद यात्रेच्या माध्यमातून गाव खेड्यातील युवकांना एकत्रित आणून अजित दादा पवार यांची कृतिशील ध्येय धोरणे सर्वसामान्य पर्यंत पोहोचवणे व महायुती सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती व लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. गाव खेड्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पक्ष संघटन मजबूत करून कार्यकर्त्यांना या संवाद यात्रेच्या माध्यमातून नवी ऊर्जा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 या संवाद यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, युवक काँग्रेस विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादी महिला काँग्रेस युती काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होऊन गावातील लोकांशी संवाद साधणार आहेत.

Post a Comment

0 Comments