LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नगरपालिकेतील अतिक्रमण येथे तॄतीय पंथीयांना सामील करून घ्या , माऊली हळणवर

तृतीयपंथी होणार अतिक्रमण विरोधी पथकात सामील.....

पंढरपूर नगरपालिकेत  तृतीयपंथी समाजाची नगर पालिकेचे मुख्याधिकारी रोकडे सो यांनी घेतली बैठक
प्रतिनिधी ..पंढरपूर 
समाजांन टाकलेली माणसं समाज उपयोगी कामात येणार पुढे
वंचितांचे नेते माऊली हळणवर यांच्या पुढाकाराने नगरपालिकेत पाठपुरावा सुरू असून आज मुख्याधिकारी रोकडे साहेब यांच्या दालनामध्ये तृतीयपंथी बांधव यांच्यासोबत एक बैठक झाली या बैठकीला माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसाठ दीपक चंदनशिवे विक्रम भैया शिरसाठ यांच्यासह या सर्व तृतीयपंथींचे गुरु परशुराम पवार उपस्थित होते या बैठकीमध्ये मुख्याधिकारी यांनी केंद्र शासनाच्या योजनेनुसार यांचा एक बचत गट  स्थापन करण्याच्या सूचना दिल्या बचत गटाच्या माध्यमातून यांना उद्योगधंद्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेनुसार कर्ज उपलब्ध करून मिळणार आहे तसेच नगरपालिकेच्या भरारी व अतिक्रमण विरोधी पथकामध्ये यांची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले तसेच नगरपालिकेकडून यांना  पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार जागा व पंतप्रधान घरकुल योजनेतून यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सर्व पूर्तता केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर सर्व तृतीयपंथी बांधवांनी मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले... यावेळी माऊली भाऊ हळणवर माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसठ,दीपक चंदनशिवे,विक्रम शिरसठ,परसु राम पवार वैष्णवी वाघमारे सीमा माने वैशाली शिरसाट नगमा गायकवाड सोनाली साबळे नीता माने आयेशा माने यांच्यासह बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments