पंढरपूर; प्रतिनिधी
समाजसेवा, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधत, मा. प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस यंदा एका सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.तसेच स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त समाजसेवक सिद्धिविनायक विरधे यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली "स्वच्छता संकल्प" उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट,अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे,माजी संचालक रापा कटेकर,संचालक विनायक हरिदास,अनिल अभंगराव,नगरसेवक विक्रम शिरसट,नरेंद्र डांगे,गणेश शिगण, यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती आलेल्या मान्यवरांच्या उपस्थित स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी आपल्या मनोगतांमध्ये अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे व माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट यांनी समाजसेवक सिद्धिविनायक विरधे यांच्या या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक केले.
या उपक्रमांतर्गत प्रभागात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा संकलन, स्वच्छतेविषयी जनजागृती, आणि ‘स्वच्छता शपथ’ घेण्यात आली. या कार्यक्रमात प्रभागातील नागरिक, विद्यार्थी, महिला,युवक आणि जेष्ठ सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी लक्ष्मण भाऊ शिरसाट यांनी सिद्धू हा गेली वयाच्या अगदी लहानपणापासून आमच्या साठी आणि परिचारक गटासाठी काम करत आहे..सामाजिक कामांसाठी त्याची कायम धडपड असते..यासाठी आम्ही सर्व जण सिद्धू विरधे यांच्या पाठीशी उभे राहू.लवकरच ते नगरसेवक होतील असे प्रतिपादन केले
कार्यक्रमाच्या शेवटी समाजसेवक सिद्धीविनायक विरधे यांनी बोलताना सांगितले की
"प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्यातून साजरा करणे हीच त्यांच्या कार्याला खरी मानवंदना आहे."
आणि पुढे देखील असेच समाजसेवात्मक कार्य पुढे सुरू राहील, असे आश्वासन दिले.
यावेळी प्रास्तविक गिरीश खिस्ते यांनी केले यावेळी ,मंदार बुचके,मुकुंद पुणतांबेकर,दीपक भंडारकवठेकर,रमेश खिस्ते दिलीप पुणतांबेकर प्रसाद पुलतांबेकर विश्वनाथ खिस्ते कपिल हरिदास
सह सिद्धिविनायक विरधे मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता
0 Comments