*शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरु असून शिक्षकांच्या चांगल्या मार्गदर्शनातूनच विद्यार्थ्यांचे करिअर घडत असते असे प्रतिपादन प्राचार्य विक्रम लोंढे सर यांनी केले. न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलीटेक्निक) कोर्टी, पंढरपूर येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.*
*पुढे बोलताना प्राचार्य लोंढे सर म्हणाले ,एखादा कुंभार जसं मातीचे सुंदर मडके घडवीत असताना त्यातील अनावश्यक भाग छालतो आणि सुंदर असं मडकं तयार करतो, अगदी तसंच प्रत्येक विद्यार्थ्यातील अनावश्यक गुण ओळखून ते बाजूला करून करून विद्यार्थ्यांचे चांगलं करिअर घडविण्याची भूमिका ही प्रत्यक्ष शिक्षकच पार पाडत असतो. विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीचा चांगला उपयोग करून स्वतःचे ध्येय साध्य करून घ्यावे असेही आवाहन त्यांनी केले. कॉम्प्युटर विभागाचे विभाग प्रमुख व सांस्कृतिक विभाग प्रमुख सचिन पुरी सर यांनीही आपले विचार व्यक्त करताना शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी कसा घडतो याची माहिती दिली. तसेच इतर कॉलेजमध्ये तुम्हाला फक्त शिक्षक भेटेल परंतु न्यू सातारा डिप्लोमा कॉलेजमध्ये तुम्हाला गुरु शिक्षक भेटेल या विधानाने उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम केले.एक दिवसाचा का असेना शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांनी चांगले अध्यापनाचे काम केले.अध्यापन चांगले केल्याबद्दल विद्यार्थ्यांचाही पुष्पगुच्छ व एक पेन भेट देऊन सन्मान करण्यात आला .यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम(नाना) निकम साहेब यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.*
*यावेळी प्राचार्य विक्रम लोंढे सर संस्था सचिव मा.श्री ज्ञानेश्वर शेडगे साहेब , ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड सर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
0 Comments