न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँण्ड मॅनेजमेंट (पॉलीटेक्निक) कोर्टी, पंढरपूर येथील सिव्हील अभियांत्रिकी विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. ही भेट
दिनांक २४ ते २५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पुणे परिसरातील महत्त्वाच्या औद्योगिक व बांधकाम कंपन्यांना देण्यात आली. या औद्योगिक भेटी अंतर्गत विद्यार्थ्यांनी कॅड डेस्क बालाजी नगर, पुणे, वायचळ कन्स्ट्रक्शन मुळशी, पुणे, तसेच लवासा सिटी मुळशी, पुणे येथे भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना सिव्हील अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध आधुनिक तांत्रिक प्रक्रिया व प्रत्यक्ष कामकाजाचे बारकावे समजावून सांगण्यात आले. कॅड डेस्क बालाजी नगर, पुणे येथे विद्यार्थ्यांना श्री पराग देशमुख साईट इंजिनीअर यांनी संगणकाधारित डिझाईन (CAD) सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण, त्याचा प्रत्यक्ष आराखडा तयार करण्यातील उपयोग, तसेच स्ट्रक्चरल ड्रॉईंगची सविस्तर माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील प्रकल्प नियोजन व डिझाईनमध्ये सॉफ्टवेअरचे महत्त्व स्पष्ट झाले. त्यानंतर वायचळ कन्स्ट्रक्शन मुळशी, पुणे येथे विद्यार्थ्यांनी चालू बांधकाम प्रकल्पांचा प्रत्यक्ष अभ्यास केला. या ठिकाणी त्यांना श्री मनोहर कोळी साईट इंजिनीअर यांनी आधुनिक बांधकाम साहित्य, काँक्रीटची गुणवत्ता, लोखंडी रॉड्सचे बांधकामातील योग्य उपयोग, साइट मॅनेजमेंट, सुरक्षा नियमावली व प्रकल्प पूर्णत्वासाठी लागणाऱ्या प्रक्रियांची माहिती दिली. औद्योगिक भेटीचा तिसरा टप्पा लवासा सिटी मुळशी, पुणे येथे घेण्यात आला. येथे विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटीचे नियोजन, लेआऊट डिझाईन, जलसंधारण, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान व शाश्वत विकास या संकल्पनांची माहिती मिळाली. या वेळी श्री सचिन ससाले साईट इंजिनीअर माहिती देण्यास उपस्थित होते. लवासा येथील प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
या दोन दिवसीय भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव, प्रकल्प व्यवस्थापनाचे ज्ञान तसेच उद्योगजगताशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. या भेटीसाठी संस्था प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर शेडगे, कॉलेजचे प्राचार्य श्री विक्रम लोंढे, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर श्री विशाल बाड आणि ऑफिस अधीक्षक श्री संतोष कवठेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ कुंभार तसेच सहकारी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट यशस्वीरीत्या पार पडली. या भेटीसाठी औद्योगिक भेट समन्वयक प्रा.अभिजित येडगे यांनी अथक परिश्रम घेतले. या भेटीमध्ये सिव्हील अभियांत्रिकी विभागातील विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ कुंभार, प्रा. ऋतुजा पवार, प्रा. वनिता चव्हाण, प्रा.अभिजित येडगे उपस्थित होते व या भेटीसाठी सिव्हील अभियांत्रिकी विभागातील प्रा. सौरभ कुलकर्णी आणि प्रा. सुरज खिलारे, लॅब असिस्टंट मिस. पायल बाबर यांचेही सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी या औद्योगिक भेटीबद्दल समाधान व्यक्त करताना प्रत्यक्ष अनुभवामुळे अभ्यासक्रमातील विषय अधिक सखोलपणे समजला असल्याचे सांगितले. या भेटीचे विशेष श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख व ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर श्री विशाल बाड तसेच आयोजक प्राध्यापकांना दिले जात असून अशा औद्योगिक भेटींचे आयोजन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

0 Comments