अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातातले पीक, घरातील संसार, जनावरांचे छत्र सर्व काही वाहून गेले आहे. शेतकरी बांधवांच्या आयुष्यभराच्या कष्टांचे स्वप्न काही क्षणात पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेलं.
अशा गंभीर प्रसंगी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. प्रणिती शिंदे यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांना धीर देत आहेत. केवळ नेतृत्वच नव्हे, तर काळजीही या भावनेतून त्यांनी पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहण्याचं आपलं कर्तव्य पार पाडत आहेत.
सामाजिक जबाबदारी म्हणून साजेसं कार्य करत खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने मतदारसंघातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. यात अन्नधान्य, पाणी बाटल्या, चादरी, कपडे आदी जीवनावश्यक वस्तूंचे किट्सचा समावेश असून यामुळे हजारो पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
ptaniti shinde
प्रणिती शिंदे
खासदार
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments