====================
सोलापूर - ( प्रतिनिधी ) - आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. केवळ पुरुषच नव्हे तर महिलांच्या आरोग्याची काळजी घेणेसुद्धा महत्वाचे आहे. सर्वांनी निरोगी आरोग्यमय आयुष्य जगण्याचा आनंद घ्यावा व आरोग्याच्या समस्या कोणालाही उद्भवू नये म्हणून प्रभाग क्रमांक १५ च्या मा. नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आयोजित केलेला मोफत आरोग्य शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे, असे गौरवोद्गगार काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी काढले.
२ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिका, सोलापूर आरोग्य विभाग व कोनापुरे चाळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रभाग क्रमांक १५ च्या माजी नगरसेविका श्रीदेवीताई फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्त नारी सशक्त परिवार , अभियानांतर्गत बुधवारी कोनापूरे चाळीतील समाज मंदिरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या शिबिरामध्ये बालरोग, स्त्रीरोग ,नेत्ररोग ,त्वचारोग, दंतचिकित्सा, मोफत रक्त तसेच मोफत रक्तदाब तपासणी करून निरोगी जीवनाचा मूलमंत्र देण्यात आला .दिवसभर चाललेल्या शिबिरामध्ये जवळपास ५०० नागरिकांनी सहभाग नोंदवून या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
आज सर्वांनाच आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे बनले आहेत. आरोग्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे निरोगी आरोग्याचा मूलमंत्र देण्यासाठी म्हणून प्रभाग क्रमांक १५ च्यावतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, या प्रभागाच्या माजी नगरसेविका आणि शिबिराच्या संयोजक श्रीदेवीताई फुलारे यांनी सांगितले.
या शिबिरात डॉ. मंजुषा चाफळकर, डाॅ तन्वी जोग,डाॅ मासवेकर, डॉ. सुप्रिया पाटील,डाॅ खंदारे, श्रीपाद नारायणकर,रुपेश गायकवाड,डॉ. बालराज म्हेत्रे
आशियानाबी शेख,मोईन शेख यांच्यासह,सिस्टर सावंत,आशा वर्कर वैजयंती कांबळे,आश्विनी बालशंकर,चंद्रकला सोनावणे आदींनी शिबिरार्थिंची तपासणी केली.
यावेळी प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, कार्याध्यक्ष हंणमतु सायबोळु, डी ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी, भीमाशंकर टेकाळे, बसवराज म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, सुमन जाधव, संजय गायकवाड, भीमराव शिंदे,राजेंद्र शिरकुल, परशुराम सतारेवाले, सुभाष वाघमारे, नागेश म्याकल, व्यंकटेश बोमेन,श्रीनिवास परकीपंडला, सचिन सुरवसे, अभिलाष अच्युकटला आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments