पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर उपविभाग चे सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.) प्रशांत डगळे
यांना मिळालेल्या बातमीनुसार मौजे चळे गावात शिवाजी पवार ऑनलाईन सर्व्हिसेस नावाचे दुकान गाळयामध्ये एजंट शिवाजी नागनाथ पवार हा लोकांकडून पैसे लावून कल्याण मटका या नावाने संभाव्य येणाऱ्या अंक आकडयावर मटका घेत असताना पोलीस पथकाने छापा मारला असता त्या ठिकाणी १ लाख ५६ हजार २४७ रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
छापा कारवाईत इसमनामे १) शिवाजी नागनाथ पवार, वय ३२ वर्षे (एजंट), २) दिनकर गोविंद मोरे, वय ६५ वर्षे, ३) मच्छिंद्र नामदेव कांबळे वय ६० वर्षे, ४) काकासाहेब गजानन चौगुले वय ४९ वर्षे, ५) पंढरीनाथ नागनाथ कदम वय ५२ वर्षे, ६) रामकृष्ण विठोबा शिखरे, वय ७३ वर्षे, ७) रामभाउ सिध्देश्वर मोरे, वय ३०वर्षे सर्व रा. रा. चळे, ता. पंढरपूर, ८) नितीन मच्छिंद्र शिंदे, वय ४० वर्षे, ९) नासिर महम्मद शेख वय ५० वर्षे, दोघे रा. आंबे, ता. पंढरपूर असे मिळून आले. त्यांचे कब्जात ९५,०७७/- रोख रक्कम, ०६ मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण १,५६,२४७-०० रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. दरम्यान पोकॉ/१४२३ राहुल हनुमंत लोंढे यांनी एजंट शिवाजी नागनाथ पवार, बुकी मालक कल्याण भोसले रा. सरकोली आणि वर नमूद इतर ०८ इसमांविरूध्द सरकारतर्फे मु.जू.अॅ.क.१२ (अ) प्रमाणे फिर्याद दिलेली आहे.
सदरची कारवाई प्रशांत डगळे सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.), पंढरपूर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोना/४२७ शिंदे, पोकॉ/२११० हुलजंती, पोकॉ/१४२३ लोंढे, सपोफौ जनार्धन करे, पोहेकॉ/१७९२ दिपक भोसले आणि पोकॉ/२०२० संजय गुटाळ यांनी पार पाडलेली आहे.

0 Comments