LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

न्यु सातारातील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांना मेंटेनन्स वर्कशॉपचे आयोजन


न्यु सातारा महाविद्यालयातील मेकॅनिकल(यांत्रिक) विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी ‘मेंटेनन्स वर्कशॉप’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन पंढरपुरातील इस बावी येथील चव्हाण मोटर्स येथे करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना यंत्रसामग्रीची देखभाल, दुरुस्ती, तसेच औद्योगिक उपकरणांच्या कार्यक्षमतेविषयी प्रत्यक्ष अनुभव देणे हा होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रम लोंढे यांनीही याविषयी विद्यार्थ्यांना आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. भविष्यातील अभियंते म्हणून अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचा नक्कीच फायदा होईल.”
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना मशीनचे नियमित तपासणी पद्धती, तेल व ग्रीसिंग प्रक्रिया, बिघाड शोध पद्धती तसेच सुरक्षित कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रात्यक्षिक सत्रामध्ये विद्यार्थ्यांना विविध औद्योगिक उपकरणांचे देखभाल कार्य स्वतः करून पाहण्याची संधी देण्यात आली.

या प्रसंगी विभागचे सीनियर प्राध्यापक विक्रम माळी यांनी विद्यार्थ्यांना उद्योगात मेंटेनन्सचे वाढते महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, “उद्योगांमध्ये यंत्रसामग्रीचे आयुष्य आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी मेंटेनन्स इंजिनिअरिंगची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.”

कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय प्राध्यापक रोहित ताणगावडे व प्राध्यापक विशाल देशमुख यांनी केले. या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग पाहायला मिळाला.

Post a Comment

0 Comments