पंढरपूर : प्रतिनिधी
६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने चैत्यभूमी दादर, मुंबई येथे केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये देशभरातील अनेक श्रामनेर बौद्ध बांधव सहभागी झाले होते.
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण शिबिरामध्ये पंढरपूर येथील राजेंद्र(नागार्जुन) सर्वगोड यांनी यश संपादन केल्याने त्यांना आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांची केंद्रीय शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
भारतीय बौद्ध महासभा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली एक राष्ट्रीय बौद्ध संस्था आहे, ज्याची स्थापना ४ मे १९५५ रोजी मुंबईत झाली. या संस्थेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रसार करणे आणि समाजातील लोकांना बौद्ध धम्म शिकवणे हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे.ही संस्था देशभरात बौद्ध धर्माच्या अनुयायांना एकत्र आणते आणि त्यांना मार्गदर्शन करते. या संस्थेच्या केंद्रीय शिक्षकपदी सर्वगोड यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

0 Comments