दोन ऑक्टोंबर गांधी जयंती, जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोर्टी येथील न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक येथे गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री विक्रम लोंढे सर, उपप्राचार्य विशाल बाड सर सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. विक्रम लोंढे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे संपूर्ण जीवन चरित्र व त्यांची अहिंसावादी विचारसरणी सामान्य माणसांना कशा पद्धतीने उपयुक्त आहे त्याचप्रमाणे स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे देशाविषयीचे योगदान पटवून सांगितले .
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे प्रतिनिधी मा. श्री ज्ञानेश्वर शेडगे साहेब यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सुरज जैयस्वाल सर यांनी

0 Comments