खंडे नवमीचे औचित्य साधून न्यु सातारा महाविद्यालयात शस्त्रपूजनाचा पारंपरिक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम लोंढे उपस्थित होते. प्रथमतः गुरुदेव दत्त व देवीची आरती करून पूजा विधीला सुरुवात केली. सजवलेल्या शस्त्रांना फुलांचा हार घालून त्यांचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमास प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.यावेळी प्राचार्य लोंढे यांनी विद्यार्थ्यांना परंपरेतील शौर्य, निष्ठा आणि सामूहिक ऐक्य यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानंतर सर्वांनी प्रसादाचे वाटप करून उत्सवमय वातावरणात खंडे नवमी साजरी केली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजाराम निकम यांच्याकडून ही शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या कार्यक्रमावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीही उपस्थित होते.

0 Comments