पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरीतील आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे सांस्कृतिक भवन येथे आदिवासी महादेव कोळी समाजाचा दसरा मेळावा संपन्न झाला.
यावेळी आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी व आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मेळाव्यास प्रारंभ झाला. यानंतर समाजातील विविध प्रश्न आणि अडचणी यावर विचारविनिमय झाला.
यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आक्रमकपणे आपल्या समाजाचे प्रलंबित प्रश्न आणि भविष्यातील आवाहने यावर आपली भुमिका स्पष्ट केली.
गेल्या कित्येक वर्षांपासून आदिवासी महादेव कोळी जमातीच्या विविध प्रश्नांकडे हे सरकार जाणुनबुजून दुर्लक्ष करत आहे. सरकारं बदलली, सत्ताधारी बदलले मात्रं आमच्या समाजाचे प्रश्न मात्र जैसे थे आहेत. असं गणेश अंकुशराव म्हणाले.
हे सरकार जातीयवादी आहे, है सरकार जात बघून मदत करते असा घणाघाती आरोप करत अंकुशराव यांनी शासनाच्या कार्यपध्दतीवर कडाडून टीका केली. लातुर मध्ये जातीच्या दाखल्यासाठी आमच्या समाजाच्या एका तरुणाने आत्महत्या केली तरी या सरकारला जाग आली नाही, आमच्या समाजातील आणखी तरुणांचा बळी गेलेला सरकारला बघायचंय का? असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता तरी आमच्या प्रश्नांकडे लक्ष घालून ते सोडवावेत. पंढरपूर ही जशी अध्यात्मिक नगरी आहे तशी ती विविध सामाजिक आंदोलनाचा प्रारंभ करुन त्याची ठिणगी राज्यभर पसरवणारी, क्रांतीज्योत पेटवणारी नगरी देखील आहे. याच पंढरीतुन मी आज घोषणा करतो की, " जर या सरकारने आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर भविष्यात आम्ही आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषींच्या जयंती दिनी त्यांची नव्हे तर वाल्या कोळ्याची जयंती साजरी करू, आमची जात कोळ्याची आहे, आमच्या जातीचे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांनी रामायणासारखे महाकाव्य लिहून जगाला अन्यायाविरुद्ध, अत्याचारा विरूद्ध लढायची प्रेरणा दिली, आणि, एकवचनी, एक पत्नी, एक बाणी प्रभु श्रीरामांची ओळख जगाला करून दिली. त्याच वाल्मिकी ऋषींचे आम्ही वंशज आज अन्याय सहन करतोय, अनेक प्रश्नांना तोंड देतोय. जर आमचे प्रश्न तातडीने शासनाने सोडवले नाहीत तर आम्ही वाल्या कोळ्याप्रमाणे आमचा जुना वाटमारीचा व्यवसाय सुरू करू ! " असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.
यावेळी आदिवासी महादेव कोळी समाजातील विविध मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा.संपादक, पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय प्रसिध्दी माध्यमावर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
कळावे ,
आपला
गणेश अंकुशराव
मोबाईल: +91 93702 71730

0 Comments