पंढरपूर:- आज दि. २७/०१/२०२६ रोजी पोनि. दशरथ वाघमोडे साो तसेच सपोफौ. ढवणे आणि चापोहेकॉ. माळी/१२०० यांच्या समवेत शासकिय वाहन नं. एमएच १३ डीवाय २४४२ मधुन माघ वारी बंदोबस्त २०२६ च्या अनुषंगाने पंढरपूर शहराबाहेरील पॉइंटवरील अंमलदार यांना चेक करुन सुचना देत तिन वाजेच्या सुमारास गुरसाळे ब्रीजखाली आलो. त्यावेळी बातमीदाराने बातमी दिली की, एमएच २५ पासींगची पांढरे रंगाची वॅगन आर कार गुटखा घेवुन येणार आहे आणि गुरसाळेकडे जाणार आहे. लागलीच सदरची हद्द पंढरपूर तालुका पोलीस ठाणेची असलेने लागलीच पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे अंमलदार यांचे मदतीने त्याचा पाठलाग करून सदरचे वाहन गुरसाळे गावच्या हद्दीत शालीवाहन कोळेकर यांच्या शेताजवळ ३:३० वाचे सुमारास पकडले
सदर वाहनामध्ये दोन इसम मिळुन आलेने त्यांच्याकडे नावागावाबाबत चौकशी केली असता चालक अर्जुन रामलिंग टापरे वयः ४१, धंदाः मजुरी,रा. रामलिंग नगर, येडशी ता. जि. धाराशिव दुसरा इसम नामे गोरख महादेव निंबाळकर वयः ५९, धंदाः हॉटेल चालक रा. बसस्टॅन्ड जवळ येडशी ता. जि. धाराशिव मुळ रा. गुरसाळे ता. पंढरपूर अशी नावे असल्याचे सांगीतले. त्यांच्याकडे गाडीतील मालाबाबत चौकशी केली. त्यांच्याकडे वाहनात काय आहे याबाबत विचारले असता गुटखा असुन त्यांच्याकडे याबाबतचे पास परमीट, पावती कांहीएक नसल्याचे सांगीतले.
सदर वाहनात अंदाजे २,५०,०००-०० रु किमतीचा आरएमडी ४ बॉक्स, विमल पान मसाला २ लहान बॅग, गायछाप ६ पोती असा माल असल्याचे दिसुन येत आहे. सदर निंबाळकर कडे ३६९४०/-तसेच टापरे यांच्याकडे २०००/- रु अशी एकुण ३८९४०/- रु रोख रक्कम मिळून आली आहे. त्याप्रमाणे सदरची पांढरे रंगाची वॅगन आर कार नं. एमएच २५ बीए ४३१८ किंमत अंदाजे ४,५०,०००/-रु आणि त्यामध्ये असलेला सुमारे अंदाजे २,५०,०००-०० रु किमतीचा आरएमडी ४ बॉक्स, विमल पान मसाला २ लहान बॅग, गायछाप ६ पोती असा सुमारे ७,००,०००/- रु चा माल आणि वर नमुद दोन इसम यांना यासोबत हजर केले आहे. सदर इसमांचे दोन मोबाईल आणि रोख रक्कम ३८९४०/- रु असा एकुण ७,३८,९४०/- रु चा मालासोबत हजर केले आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, (भा.पो.से) अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग चे प्रशांत डगळे (भा.पो.से) व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांचे मार्गदर्शनाखाली कल्याण ढवणे, पोहवा /१७३७ कांबळे, चापोहेकॉ. माळी/१२००, पंढरपुर तालुका पो.स्टे. चे सपोफौ. शेंडगे आणि पोहेकॉ. सरगर / १०० यांनी केली आहे

0 Comments