LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

एलएलबी (लॉ) प्रवेशासाठीच्या 'सीईटी २०२६’ या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ


पंढरपूर– शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये एलएलबी (लॉ) ला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या व राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल), मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 'सीईटी २०२६' या परीक्षेकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार तीन वर्ष कालावधी साठी शनिवार, दि.२४ जानेवारी २०२६ पासून ते शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत तर पाच वर्ष कालावधी साठी रविवार, दि.२५ जानेवारी २०२६ पासून ते शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अशी मुदतवाढ देण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
     एलएलबी (लॉ) प्रवेशासाठी अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या 'एमएएच-सीईटी २०२६' या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची मुदत तीन वर्ष कालावधीसाठी गुरुवार, दि.०८ जानेवारी २०२६ पासून ते शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ पर्यंत तर पाच वर्ष कालावधीसाठी शुक्रवार, दि.०९ जानेवारी २०२६ पासून ते शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ पर्यंत अशी मुदत दिली होती. परंतु या कालावधीत काही कारणाने विद्यार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करता आली नाही हे ओळखून या प्रक्रियेला मुदतवाढ दिली असून आता तीन वर्ष कालावधी साठी शनिवार, दि.२४ जानेवारी २०२६ पासून ते शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत तर पाच वर्ष कालावधी साठी रविवार, दि.२५ जानेवारी २०२६ पासून ते शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरु राहणार आहे. सदर फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरी लॉ कॉलेजमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी सदर फॉर्म भरण्यासाठी येताना आपल्या प्रवर्गानुसार आवश्यक असणारी फॉर्म फी आणि आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. सीईटी फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःचा अपार आयडी तयार करून घ्यावा लागेल, तसेच आधार कार्ड, आयडेंटी आकाराचा रंगीत फोटो, एटीएम कार्ड अथवा ऑनलाईन बँकिंगचा लॉगीन आयडी आणि त्याचा पासवर्ड, ओटीपी करिता मोबाईल या महत्वाच्या बाबी आवश्यक असणार आहेत. याबाबत शासनाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी प्रा. उत्तम अनुसे (मोबा.-९१६८६५५३६५), तर एल.एल.बी. संदर्भात अॅड. विक्रम पाटील (मोबा.नंबर–९०९६०१६६२५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments