LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

गोपाळपूर येथील हळदी कुंकू च्या कार्यक्रमातील चोरीस गेलेले आठ लाख 25 हजार रुपयांचे दागिने पंढरपूर तालुका पोलिसांनी केले जप्त एकूण आठ लाख 25 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई


पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 126 ऑब्लिक 26 डी एन एस कलम 304 या गुन्ह्यात फिर्यादी आबासाहेब आसबे राहणार गोपाळपूर यांनी दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार यांच्या पत्नीचे दागिने हळदी कुंकू साठी जात असताना सुमारे आठ लाख 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे वरील कलमाप्रमाणे cr number 126/26 BNS कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल होता 
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये  फिर्यादी  यांच्याकडे सखोल तपास करून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे फिर्यादी कडून घटनेची संपूर्ण माहिती घेऊन पंढरपूर तालुका  पोलिसांनी घटनेच्या दिवशी हळदी कुंकू च्या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांकडे विचारपूस करून त्यातून सखोल तपास करून मंगळवेढा येथील व्यवसायिकअविनाश वाघमारे राहणार मंगळवेढा याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता सुरुवातीला उडवा उडवी ची उत्तर दिले नंतर अविनाश वाघमारे राहणार मंगळवेढा व गोपाळपूर येथील त्याचा मित्र यांच्याकडून  चोरीस गेलेले सर्व दागिनेएकूण आठ लाख 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एकूण वजन 55 ग्राम सोन्याचे दागिने काढून दिले ते पंचायत समक्ष जप्त करण्यात आले आहे 
सदर गुन्ह्यातील एकूण825000 रुपयांचे सोन्याचे दागिने पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याची शंभर टक्के रिकव्हरी केली आहे 

सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती विभावरी रेळेकर मॅडम पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले asi विजू गायकवाड पोलीस हवालदार सचिन आटपाडकर पोलीस हवालदार साळुंखे बाजीराव काकडे सागर गवळी मंगेश रोकडे विजयकुमार आवटी अभिमन्यू गरड चालक पोलीस हवालदार हासन नदाफ विलास घाडगे यांच्या पथकाने केली

Post a Comment

0 Comments