LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

‘समर्थ विद्यार्थी-समर्थ भारत’ या संकल्पनेला पुणे विभागात उस्फुर्त प्रतिसादस्वेरीचे संस्थापक प्रा. डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या संकल्पनेतील अभियानात जवळपास ५४ हजार शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतला संकल्प



पंढरपूर- पुणे विभाग शिक्षक मतदार संघात असलेल्या पाचही जिल्ह्यात गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या संकल्पनेतून 'समर्थ विद्यार्थी-समर्थ भारत संकल्प अभियान' राबविले गेले होते. या अभियानात शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून यामध्ये ३६० शाळा, महाविद्यालयांतून ४३२९ शिक्षक व ४९१५२ विद्यार्थी सहभागी झाले होते.  
         गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीच्या माध्यमातून तंत्रशिक्षणात विशेष ओळख निर्माण केलेल्या प्रा. डॉ. बी.पी. रोंगे सरांना व त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमांना शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल करणाऱ्या डॉ. बी.पी. रोंगे सरांनी शिक्षकांचे देखील प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा शिक्षकांमधून वाढली आहे. यासाठी सर्व जिल्ह्यांतील शिक्षकांकडून डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या भेटींना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'समर्थ विद्यार्थी, समर्थ भारत' हे अभियान राबविण्यात आले. 'विकसित भारत २०४७' हे स्वप्न साकारण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि कौशल्ये विकसित करणे काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून डॉ. बी.पी. रोंगे सरांनी 'समर्थ विद्यार्थी-समर्थ भारत' या उपक्रमांतर्गत 'संकल्प अभियान' राबविले होते. सोमवार, दि.२६ जानेवारी २०२६ रोजी आपल्या विद्यालयात अथवा महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर 'समर्थ विद्यार्थी-समर्थ भारत’ हा संकल्प सामूहिकरीत्या राबविण्याचे आवाहन केले होते. या संकल्प अभियानाला पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या अभियानात विद्यार्थी व शिक्षकांनी ध्वजारोहणानंतर हात समोर करून ‘मी मनापासून ज्ञानार्जन करून, स्वतःची कौशल्ये विकसित करेन आणि संविधानाचा आदर राखून लोकशाही मूल्ये जोपासणारा 'आत्मनिर्भर' नागरिक बनेन, मी परिसर स्वच्छ ठेवून निसर्गाचे रक्षण करेन, स्वतःला 'सक्षम' ठेवण्यासाठी मी नियमित व्यायाम करेन आणि व्यसनांपासून सदैव दूर राहीन. मी अंधश्रद्धा दूर ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासेन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर लोककल्याणासाठीच करेन, मी भारतीय संस्कृती आणि स्वदेशी उत्पादनांचा अभिमान बाळगून त्यांचाच अंगीकार करेन, सर्व भारतीयांना बांधव मानून मी समाजात एकता टिकवेन आणि २०४७ पर्यंत भारताला 'विकसित राष्ट्र' बनवण्यासाठी माझे सर्वस्व समर्पित करेन.’ अशी प्रतिज्ञा घेतली. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत मिळून ३६० शाळा, महाविद्यालयांतून ४३२९ शिक्षक व ४९१५२ विद्यार्थी असे मिळून ५३८४१ जणांनी 'समर्थ विद्यार्थी-समर्थ भारत’ या अभियानात सहभाग घेवून प्रतिज्ञा घेतली. 
चौकट-
विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती निष्ठा, संविधानाचा सन्मान आणि आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे, प्रामाणिकपणा, सहिष्णुता, शिस्त आणि सामाजिक न्याय यांसारखी मानवी मूल्ये विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता आणि तो यशस्वी झाला.
                                                                         – डॉ. बी.पी. रोंगे, संस्थापक व प्राचार्य स्वेरी, पंढरपूर

Post a Comment

0 Comments