अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. अर्जुनराव चव्हाण यांच्या शुभहस्ते बोहाळी ता. पंढरपूर येथे युवा शाखेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले. अध्यक्षीय भाषणामध्ये अर्जुनराव चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, मराठा युवकांनी राजकारणाच्या पाठीमागे न लागता आपण उद्योजक बनावे तसेच शेतीला जोड व्यवसाय म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे छोटे-मोठे उद्योगधंदे उभारून आपला व्यवसाय कसा वाढवता येईल याकडे लक्ष द्यावेत. मराठा समाजाने आपली शैक्षणिक प्रगती साधून सारथी तसेच कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ आणि इतर योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा. यावेळी सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष- शिवाजीराव मोरे यांनी मराठा महासंघाच्या आठ ते नऊ शाखा मोठ्या थाटामाटात काढून तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील अनेक तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले. असे कौतुकही चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पाटील, डाॅ.उत्तम कुसुमडे, भास्कर कुसुमडे, सर्जेराव जाधव, सतीश कुसुमडे( उपसरपंच), जालिंदर घोडके, नितीन कुसुमडे, रसूल मुलांनी, सुरज बहिरे ,संदीप कुसुमडे कल्याण चव्हाण तसेच विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष- हनुमंत कदम, शहराध्यक्ष- अमोल पवार, शहर उपाध्यक्ष- पांडुरंग शिंदे शाखाध्यक्ष- सागर पवार, उपाध्यक्ष सोहम कुसुमडे, खजिनदार अभिजीत कुसुमडे, सचिव ओंकार कुसुमडे, संघटक समाधान कुसुमडे, कार्याध्यक्ष कल्याण चव्हाण, सदस्य चंद्रकांत कुसुमडे, शिवेंद्र जाधव, विश्वचित जाधव, हर्षवर्धन कुसुमडे, महेश बोबडे, केशव गोरे, संदीप कुसुमडे,अभिषेक कुसुमडे, पुरुषोत्तम घोडके, प्रज्वल पवार, राज कुसुमडे, कुणाल गुरव, विशाल पांढरे, संदीप पवार, अजित कुसुमडे, इत्यादी तसेच सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments