LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *खासदार प्रणिती शिंदे* यांनी अधिवेशनामध्ये केलेल्या मागणीला यश.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा !📢 महाराष्ट्र 🛣️



सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-बी च्या भुरीकवठे-वागदरी-अक्कलकोट-नागणसूर-तोळनूर ते महाराष्ट्र-कर्नाटक राज्यसीमा सेक्शनच्या रुंदीकरणासाठी ३५३.२३ कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

सदर प्रकल्पांतर्गत एकूण ४७.६६३ किमी लांबीच्या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार असून प्रकल्पामध्ये वागदरी येथे बायपास व सांगवी येथे पुलाच्या बांधकामास देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. 

या मार्ग प्रकल्पामुळे कर्नाटक राज्याकडून येणारी जड वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होणार असून आंतरराज्यीय वाहतुकीस चालना मिळणार आहे.

या मार्गामुळे लातूर, उमरगा तसेच आंध्र प्रदेश येथील भाविकांना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे.

#PragatiKaHighway #GatiShakti

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments