LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *विद्यार्थ्यांच्या परीक्षाकाळात वीज तोडणी थांबवा; थकीत वीज बिलासाठी हप्ते द्या – खासदार प्रणिती शिंदे*


सोलापूर : दहावी व बारावीच्या परीक्षांचा कालावधी सुरू असताना घरगुती वीज ग्राहकांची कनेक्शन तोडणी केल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहरासह अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यांत थकीत वीज बिलामुळे वीज तोडणी सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सोलापूर येथील अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या भागातील बहुतांश नागरिक हे शेतकरी वर्गातील असून आर्थिक अडचणींमुळे एकरकमी वीज बिल भरणे त्यांना शक्य होत नाही. मात्र, थकीत वीज बिल हप्त्याने भरण्यास ग्रामस्थ पूर्णपणे तयार आहेत.
परीक्षेच्या काळात वीज खंडित झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची आणि त्यांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
त्यानुसार, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांत विद्यार्थ्यांच्या परीक्षा कालावधीत वीज तोडणी तात्काळ थांबवून थकीत वीज बिलासाठी सुलभ हप्त्यांची व्यवस्था करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments