दिनांक 28फेब्रुवारी 2026 रोजीपहाटे 5 वाजताच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चळे गावातील दरलिंग मंदिर रोड परिसरात भीमा नदी पात्रा लागत असलेल्या ठिकाणी अवैधरित्या आयशर कंपनीच्या टेम्पो क्रमांक kl 10 x9663 याआयशर टेम्पोमध्ये टेम्पो चालक शुभम गायकवाड राहणार चळे हा आपल्या ताब्यात अवैधरित्या महाराष्ट्र शासनाची मालकीची भीमा नदी पात्रातील वाळू सदर टेम्पोमध्ये चोरून घेऊन जात असताना त्यास ताब्यात घेऊन पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर शुभम गायकवाड राहणार चळे गाव तालुका पंढरपूर व आयशर टेम्पो चा मालक यांचे विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 305 303 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून सदर आरोपीकडून एकूण 2 ब्रास वाळू व आयशर कंपनीचा टेम्पो असा एकूण 10 लाख 12 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतलेला आहे व सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर API श्रीमती विभावरी रेळेकर मॅडम पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश रोकडे पोलीस स्वप्निल वाडदेकर हेडकॉन्स्टेबल अभिमन्यू गरड पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास देशमुख दीपक भोसले पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ सागर गवळी, विजयकुमार आवटी पोलीस चालक चाटे विलास घाडगे हासन नदाफ यांच्या पथकाने केली आहे

0 Comments