LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

म्हैसाळ योजनेतील मंगळवेढ्यातील लाभ क्षेत्रातील गावांना स्वतंत्र बंदिस्त नलिके द्वारे पाणी देण्यासाठी सर्व्हे करण्याच्या जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना


म्हैसाळ योजनेतील मंगळवेढा तालुक्यातील लाभ क्षेत्रातील सर्व गावाना उच्च दाबाने पाणी मिळण्यासाठी म्हैसाळच्या मुख्य कॅनाल वरून  स्वतंत्र बंदिस्त पाईप द्वारे पाणी देणे तसेच शिरसी, मानेवाडी,भोसे गावातील दक्षिण पश्चिम बाजूच्या भागाला स्वतंत्र पाईपद्वारे  पाणी देण्यासाठी  सर्व्हे करावा,शिरनांदगी, पडोळकरवाडी, मारोळी व लवंगी हे साठवण तलाव मुख्य कॅनालवरुन थेट बंदीस्त नलिकेद्वारे भरून देण्याच्या कामाचे सुधारीत संकल्पन करून तातडीने सर्व्हे करून प्रस्ताव देण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांनी दिल्या आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ योजनेतील पाणी मिळत असलेल्या गावांना मिळणाऱ्या पाण्याबाबत च्या अडचणी सोडवण्यासाठी व नवीन तीन गावांना पाणी देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबई येथे बुधवार  दिनाक 4मार्च रोजी 5 वाजता  
मंत्रालयात बैठक आयोजित केली होती या बैठकीस आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित राहून मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील 19 गावांना म्हैसाळचे पाणी मिळत आहे परंतु हे पाणी अपुऱ्या व कमी दाबाने मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा उपयोग होत नाही व अपुऱ्या दाबामुळे मिळणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वाद विवाद होत असल्याने वितरिका क्रं 1, वितरिका क्रं 2, उमदी डी. वाय. वरून 8 गावांना पाणी दिले जाते त्याऐवजी मुख्य कालव्यावरून मंगळवेढा तालुक्यासाठी स्वतंत्र बंदिस्त पाईप टाकून द्यावे तसेच शिरशी मानेवाडी भोसे या गावाचा कोणत्याही  पाणी योजनेत समावेश नसल्यामुळे या गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी द्यावे तसेच पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी,लवंगी या साठवण तलावात बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी सोडण्याची मागणी आ.आवताडे यांनी केली होती त्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही बैठक बोलावली होती या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी
म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत उमदी वितरीकेद्वारे सिंचन होत असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील ८ गावांसाठी जत शाखा  मुख्य कालवा येथून थेट स्वतंत्र बंदीस्त पाईप टाकुन देणे तसेच जत येथील मुख्य मुख्य कालव्यातून  स्वतंत्र बंदिस्त पाईप टाकने,
म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत मंगळवेढा तालुक्यातील शिरसी, मानेवाडी, भोसे गावातील दक्षिण-पश्चिम बाजुच्या भागाला स्वतंत्र पाईपद्वारे पाणी देणेबाबत तात्काळ सर्वेक्षण करून  तातडीने प्रस्ताव द्यावा म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत मंगळवेढा तालुक्यातील लाभक्षेत्रात असलेले शिरनांदगी, पडोळकरवाडी, मारोळी व लवंगी हे साठवण तलाव उप  वितरिका व लहान पाईप द्वारे भरून देत असल्याने ते साठवण तलाव भरत नसल्याने ते त्वरित भरण्यासाठी मुख्य कॅनालवरुन थेट बंदीस्त नलिकेद्वारे भरून देण्याच्या कामाचे सुधारीत संकल्पन तयार करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच मंगळवेढा तालुक्यासाठी 1.27 टी एम सी पाणी राखीव असताना तालुक्याला केवळ .27 टी एम सी इतके पाणी मिळत असल्याने तालुक्यावर अन्याय होत असल्याचे आ आवताडे यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणताच विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवेढा तालुक्याचे हक्काचे  सर्व पाणी त्यांना मिळाले पाहिजे त्यादृष्टीने सर्वे करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या.  यावेळी आमदार समाधान आवताडे डॉ.संजय बेलसरे सचिव (ला.क्षे.वि), डॉ.एच.टी.धुमाळ कार्यकारी संचालक.  संजीव चोपडे, मुख्य अभियंता(वि.प्र)  काटपल्लीवार सहसचिव
रोशन हटवार उपसचिव
चंद्रशेखर पाटोळे अधीक्षक अभियंता. का.ला.मासाळ कार्यकारी अभियंता,स्व.अ.गोसावी सहाय्यक कार्यकारी अभियंता,जि. प. सदस्य प्रदीप खांडेकर, स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments