पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.२.नं.६९/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे क. ३०९ (६) ११०, २८१, १२५ (ब), ३२४ (४) ३(५) मोटार वाहन कायदा कलम १३४(अ), १३२ (ब), १८४, १८७ प्रमाणे दाखल असुन सदरचे दाखल गुन्हयातील फिर्यादी नामे दिलीप शालन शंकर कदम, वय ५५ वर्ष व्यवसाय सराफ रा. प्लॅट नं. ४७३९ पंढरपूर ता. पंढरपुर जि. सोलापूर यांना दिनांक २०/०२/२०२६ रोजी रात्री ०९/०० वा. चे सुमारास वरदविनायक हॉस्पीटलचे समोर कराड रोड पंढरपूर येथे अज्ञात आरोपीने पांढ-या रंगाचे थार चारचाकी गाडीने फिर्यादी हे चालवत असलेल्या बुलेट मोटार सायकल हिचा पाळत ठेवून तिचा पाठलाग करून फिर्यादी यांचे ताब्यात असलेल्या बॅगमध्ये सोन्याचे दागिने हिसकावण्याच्या उददेशाने त्यांचे मोटार सायकलीस पाठीमागुन धडक देवुन त्यांना जखमी करून व त्याचे मोटार सायकलचे नुकसान करून त्यांचे ताब्यातील चाव्यांची बॅग जबदस्तीने हिस्कावुन घेवुन त्याचेकडे असलेल्या पांढ-या रंगाच्या थार बारचाकी गाडीने पळून गेले होते. सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय कार्यालय, पंढरपुर विभाग व गुन्हे प्रकटीकरण शाखा, पंढरपुर शहर यांचे संयुक्तिक सुरू होता.
सदर गुन्हयाचा तपास चालू असता गोपनीय बातमीदारांमार्फत तसेच सदर गुन्हयाचे तपासकामी पथके तयार करून पंढरपूर शहरातील व आजुबाजूचे गावातील जवळपास २५० सी.टी.व्ही फुटेज चेक करून व मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हयात दोन आरोपी इसम नामे १) जीवन उर्फ करण बंडूगिरी गोसावी वय. २२ वर्षे, रा. विप्रदत्तघाट, कालीकादेवी चौक, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर, २) शुभम सुभाष जाधव वय. २६ वर्षे, रा. जगदंबा वसाहत, संतपेठ पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर यांचा दाखल गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक १२/०३/२०२६ रोजी अटक करून त्यांचेकडे सदरचा गुन्हा करणेकरीता मुख्य पाहिजे आरोपी नामे रोहित जगदाळे याचेसह कट रचुन सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत डगळे, पंढरपूर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री. दशरथ वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. नितीन जगताप, पोसई महादेव पिसाळ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गोसावी, सपोफौ कदम, पोह ३९६ हेंबाडे, पोह ३९८ सिरमा गोडसे, पोह १७८९ सचिन हॅबाडे, पोह १३०७ पाटील, पोना/५६३ साहिल तांबोळी, पोना/५४६ कृष्णा पकाले, पोशि १२१६ शहाजी मंडले, पोशि १३०४ नवले, पोकॉ १५१३ बजरंग बिचुकले, पोकॉ १२४० ठाकर तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पोशि ११८२ रतन जाधव यांनी केली आहे.

0 Comments