अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्हयातील जबरी चोरीस प्रतिबंध करणेच्या आदेशान्वये मा. . प्रशांत डगळे, सहा पोलीस उपअधिक्षक पंढरपुर विभाग पंढरपुर व मा. श्री. दशरथ वाघमोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर पोलीस ठाणे ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी -सौ. सुषमा दत्तात्रय पाटील, वय. ४४ वर्षे, रा. देगाव ता. पंढरपूर जि. सोलापूर यांचे दिनांक १७मार्च रोजी १२/४५ वा. चे सुमारास पंढरपूर बस स्थानकावर पर्समधील सोन्याचे दागिने अज्ञात चोरटयाने चोरले होते.
त्यानंतर सदर गुन्हयाचा तपास चालू असता सदर गुन्हयाचे तपासकामी पथके तयार करून पंढरपूर व सोलापूर शहरातील एकुण ६२ सी.सी.टी. व्ही फुटेज चेक करून व मोबाईल टॉवर, सी. डी. आर चे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हयात महिला आरोपी - १) आयेशा युसुफ शेख, वय. ३६ वर्षे, रा. शाहजाहूर दर्गा समोर, १०६ रेहमतबी झोपडपटटी, सिध्देश्वर पेठ, सोलापूर जि. सोलापूर हिने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने तिचा रायचूर कर्नाटक येथे जावुन शोध घेवुन तिला कर्नाटक येथुन ताब्यात घेवुन तिच्याकडे नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिन्याबाबत तपास केला असता तिने नमुद गुन्हयातील सोन्याचे दागिने १) एक ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, २) एक १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असे एकुण ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे ९,००,०००/- रुपये किंमतीचे तिच्याकडुन जप्त करून सदर गुन्हयातील महिला आरोपी हीस अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक . प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस अधीक्षक, पंढरपूर विभाग . प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दशरथ वाघमोडे, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गोसावी,/शरद कदम, सिरमा गोडसे, सचिन हेंबाडे, सोमनाथ पाटील, साहिल तांबोळी, कृष्णा पकाले, शहाजी मंडले, दिपक नवले, बजरंग बिचुकले, हर्षद ठाकर तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे रतन जाधव यांनी केली आहे.

0 Comments