LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांची जुगार अड्डयावर धाडया कारवाई, ४ लाख ६ हजार ६४० रू. चा मुद्देमाल जप्त



पंढरपूर(प्रतिनिधी):- प्रशांत डगळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.), पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांना मिळालेल्या बातमीनुसार मौजे कोर्टी गावातून माळेवस्तीकडे जाणारे उजनी कॅनॉलच्या बाजुस दिनेश दिगंबर चव्हाण याचे शेतातील पत्राशेड समोर काही इसम जुगार खेळत असल्याचे बातमी मिळाल्याने बातमीप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पंढरपूर यांचेकडील पोलीस पथकाने बातमीची खात्री करून छापा मारला. छापा कारवाईत इसमनामे १) दिनेश दिगंबर चव्हाण, वय ३१ वर्षे २) रियाज जावेद सय्यद, वय ३५ वर्षे, ३) लतिफ दिलावर शेख वय ४९ वर्षे, ४) तायाप्पा कृष्णा काळे वय ४५ वर्षे, ५) उमेश मच्छींद्र काळे वय ४५ वर्षे, ६) नवनाथ अंकुश गडदे, वय ३५ वर्षे, ७) गोविंद विठ्ठल कोळेकर, वय ५५ वर्षे ८) बिरा पांडुरंग अनुसे वय ४०, ९) हाजु यासिन शेख वय ६० वर्षे सर्व रा. कोर्टी, ता. पंढरपूर असे मिळून आले. त्यांचे कब्जात ४,६४०/- रोख रक्कम, ०८ मोबाईल, ०७ मोटार सायकल व जुगाराचे साहित्य असा एकुण ४,०६,६४०-०० रू. किंमतीचा मुददेमाल मिळून आला. म्हणून पोना/४२७ विनोद सुग्रीव शिंदे यांनी वर नमूद ०९ इसमांविरूध्द सरकारतर्फे मु.जू.अॅ.क. १२ (अ) प्रमाणे फिर्याद दिलेली आहे.

सदरची कारवाई प्रशांत डगळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.), पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ / ८५ कामतकर, पोना/४२७ शिंदे, पोकॉ/२११० हुलजंती, पोकॉ/१४२३ लोंढे यांनी पार पाडलेली आहे.

Post a Comment

0 Comments