दिनांक नऊ मे 2026रोजी पंढरपूर तालुका पोलिसांनी आगामी यात्रा सण उत्सव च्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील
मौजे पोहोरगाव शेगाव या ठिकाणी अवैध दारू साठ्यावर रेड करून एकूण पंधरा हजार दोनशे रुपयांचा देशी-विदेशी दारू साठा जप्त केलेला आहे याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांनी आरोपीं नावे
बंडू यासीन सय्यद वय 52 वर्षे राहणार पोहोरगाव याचे विरुद्ध व आरोपी नामे नरेश सुरेश दुध्दम वय 40 वर्षे राहणार शेगाव याचे विरुद्ध मुंबई दारूबंदी कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून
सदरची कारवाई
माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची
वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे आबासाहेब शेंडगे पोलीस हवालदार गावडे पोलीस हवालदार सुजित उबाळे सुभाष देशमुख दीपक भोसले पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ यांच्या पथकाने केली आहे

0 Comments