प्रतिनिधी/-
पंढरपूर तालुक्यातील सध्या ज्वलंत प्रश्न असणार्या वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शनिवार दि.२०जून २६ रोजी स.१०वा. माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महावितरणच्या हुकूमशाही आणि मनमानी कारभाराविरोधात हजारो शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी आवाहन केले आहे.
सध्या शेतात उभी असलेली पिके डोळ्यादेखत जळून खाक होत आहेततरी देखील शेतकऱ्यांच्या नदीकाठ व शेती पंपांची वीज कापली जात आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे महावितरणचे जाचक धोरण यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. वीज वितरण कंपनीने तात्काळ ही सक्तीची वीज तोडणी थांबवावी यासाठी येत्या २२जून पासून मुंबई अधिवेशनात देखील ही मागणी उचलून धरणार असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले..

0 Comments