LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेची सांगता,



पंढरपूर दि.09 :- ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून पासून सुरुवात करण्यात आली होती व आज दि.09 जून रोजी सांगता पुजा मंदिर समितीचे सदस्य व अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.

श्रीविठ्ठलाला उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून ही पूजा केली जाते. विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यात येते. या चंदनउटी पुजेची आज दि. 09 जून रोजी सांगता पुजा झाली. त्यामध्ये श्री विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेची चंदनउटी पुजा अनुक्रमे सदस्य संभाजी शिंदे व लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसेच सदस्या शकुंतला नडगिरे व व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी विभाग प्रमुख भिमाशंकर सारवाडकर, सहायक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी व पांडूरंग दशपुत्रे उपस्थित होते.

मागील वर्षी प्रमाणे भाविकांना श्रींची चंदनउटी पुजा ऑनलाईन पध्दतीने बुकींग करण्यास उपलब्ध करून दिली होती. त्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या पूजेच्या माध्यमांतून मंदिर समितीला सुमारे 14 लक्ष 64 हजार इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामध्ये श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेकडे अनुक्रमे रूपये 21,000 व 9,000 इतके देणगी मुल्य होते. दि.19 मार्च ते 09 जून कालावधीत एकूण पुजेचे 82 दिवस उपलब्ध झाले होते. त्यामध्ये अधिक मास वगळता इतर दिवशी श्री विठ्ठलाकडे 50 व रूक्मिणीमातेकडे 46 पुजा भाविकांसाठी उपलब्ध झाल्या होत्या. यापूजेसाठी अंदाजे 90 ते 95 किलो चंदनाचा वापर करण्यात आला आहे. यंदा चंदनउटी पुजा कालावधीत अधिकमास आल्याने, अधिकमास कालावधीतील पुजा मंदिर समिती मार्फत करण्यात आल्या होत्या.

Post a Comment

0 Comments