LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मुबंई मधील शिक्षकांच्या आंदोलनाला स्वेरीच्या डॉ. बी.पी रोंगे सरांची भेट व पाठींबा



पंढरपूर - खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला गोपाळपूर (ता. पंढरपूर)  येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी भेट देऊन शिक्षकांचे प्रश्न जाणून घेतले व या आंदोलनाला पाठिंबा दिला.
      शिक्षकांनी केलेल्या या आंदोलनात प्रामुख्याने २० टक्के, ४० टक्के, ६० टक्के अनुदान घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना 'सरसकट' हा शब्द वगळून यापुढील वाढीव टप्पे संच मान्यतेनुसार १ जून २०२६ पासून मिळावेत, त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना २५ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार समान टप्प्यावर अनुदान देण्यासाठी आदेश व्हावे. २०२२-२३ मध्ये शेवटच्या वर्गांची कमी पटसंख्येमुळे अपात्र करण्यात आलेल्या शाळांना संचमान्यता २०२३-२४ किंवा २०२४-२५ च्या संच मान्यतेमधील पदे ग्राह्य धरण्यात येऊन अनुदान देण्यात यावे, तसे शुध्दीपत्रक काढण्यात यावे. पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व वर्ग तुकड्या अनुदानासह घोषित करण्यात याव्यात, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वैद्यकिय प्रतिपुर्ती योजना लागू करण्यात यावी, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करणे या व इतर मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. या आंदोलनाला पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी अग्रेसर असेलेले उमेदवार व तज्ञ अभ्यासक प्राचार्य डॉ. रोंगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलन प्रमुख खंडेराय जगदाळे यांच्याकडून नेमक्या काय मागण्या आहेत त्या जाणून घेतल्या व त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या समवेत विविध पदाधिकारी व शिक्षक तसेच महाराष्ट्र राज्याच्या शिक्षक समन्वय संघाचे विविध पदाधिकारी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments