LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पेट्रोल पंप चालक,मालकांनी भाविकांना शुध्द पाणी व शौचालय उपलब्ध करावेतउपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांचे आदेश



  पंढरपूर,दि (19)- आषाढी यात्रा सोहळा दि.25 जुलै 2026 रोजी संपन्न होणार असून दि.15 ते 29 जुलै  यात्रा कालावधी आहे. यात्रा कालावधीत तसेच यात्रा सोहळ्याच्या मुख्य दिवशी पंढरपूर शहरामध्ये व परीसरात खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. त्यावेळी शहरात असणा-या सोईसुविधा भाविकांना कमी पडू नयेत, याकरीता पेट्रोल पंप चालक,मालकांनी पेट्रोल पंपाचा परिसर स्वच्छ ठेवून, भाविकांसाठी मोफत निर्जंतुक पिण्याचे पाणी , स्वच्छ शौचालय उपलबध करुन देण्याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी आदेश पारीत केले आहेत.

           आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील प्राप्त अधिकारानुसार, उपविभागीय दंडाधिकारी श्री. इथापे यांनी आदेश पारीत केले असून,  उपलब्ध सुविधांचे माहितीफलक पेट्रोलपंपाच्या ठिकाणी दर्शनी भागात लावण्यात यावेत.सदरच्या आदेशाची संबंधितानी अंमलबजावणी करावी अन्यथा संबंधिताविरूद्ध भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 223 नुसार कार्यवाही करणेत येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

                                                                     0000000

Post a Comment

0 Comments