LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आज ऐतिहासिक सोहळा 🙏 मणिपूर मध्ये होणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने पाच लाख रुपयांची सेवा जाहीर करण्यात आली.



मणिपूरमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी चे मंदिर होणार ही वार्ता ऐकून मन गहिवरले.
ज्या विठ्ठलाने मला नवीन जीवन दान दिले, त्याच्या सेवेसाठी 
मी मणिपूरच्या मंदिरासाठी ५ लाख रुपयांची सेवा जाहीर केली.
 यावेळी राम मंदिर अयोध्या ट्रस्ट चे  कोषाध्यक्ष आदरणीय गोविंद गिरी महाराज, केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापरावजी जाधव, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मणिपूरचे गृहमंत्री गोविंद दास यांच्या हस्ते मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा सन्मान करण्यात आला.
 यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे ऑनलाईन उपस्थित होते.
आज दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये साहित्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या  मध्ये आयोध्या राम मंदिर समितीचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत  केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव, मणिपूरचे गृहमंत्री गोविंद दास, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शिर्डी देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादींच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या या कार्यक्रमाचा मुख्य आशय असा होता की मणिपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर याची निर्मिती करण्याचे तेथील सरकारने ठरवले आहे.
 यासाठी महाराष्ट्रातील या सर्व मंदिर समितीने त्या ठिकाणी मदत करायची आहे.
 योगायोगाने मी त्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होतो आणि मग आपल्या श्री विठ्ठलाचे,पांडुरंगाचे मंदिर मणिपूर मध्ये होतंय म्हटल्यानंतर ज्या विठ्ठल भगवंताने मला अपघातातून वाचवलं त्या माझ्या भगवंताचं मंदिर त्या ठिकाणी होते म्हणल्यावर मी त्वरित या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मणीपुर मध्ये बांधण्यासाठी पाच लाख रुपये ची सेवा जाहीर केली.
 याबद्दल माझा अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आदरणीय गोविंद गिरी महाराज, केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव,  मणिपूरचे गृहमंत्री गोविंद दास, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर  यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments