LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीच्या निखील जाधव यांची ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रा.लि.’ या कंपनीत निवडप्लेसमेंटद्वारे नोकरीच्या तब्बल ४७३ पेक्षा जास्त संधी



पंढरपूरः ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’  या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणारे निखील नवनाथ जाधव यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून यंदा देखील चांगल्या प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांचा स्वेरीकडे अधिक कल दिसत आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे  प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
             ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागामधील अंतिम वर्षात शिक्षण घेणारे निखील नवनाथ जाधव यांची निवड केली असून त्यांना वार्षिक रु. ४ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमधून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. स्वेरीचे विद्यार्थी आज विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यात आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. ‘स्वेरी’ मधून विविध कंपन्यात प्लेस होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येते. विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत स्वतंत्रपणे कुशल प्रशिक्षकांद्वारे एप्टीट्युड, कम्युनिकेशन स्कील, टेक्निकल स्कील, विविध सॉफ्टवेअर्स, मॉक इंटरव्युव्ह यांचे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाते. मागील शैक्षणिक वर्षात कॅम्पस प्लेसमेंटद्वारे तब्बल ४७३ पेक्षा अधिक नोकरीच्या संधी प्राप्त करून देण्यात आल्या आहे तर अद्याप काही कंपन्यांचे निकाल येणे बाकी आहेत. स्वेरीतील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. स्वेरीने प्रवेश प्रक्रियेत तसेच वार्षिक परीक्षेच्या निकालातही मारलेली गरुड झेप दिसून येते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक  व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी ‘मॅग्ना ऑटोमोटीव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’  कंपनीत निवड झालेल्या निखील जाधव यांचे अभिनंदन केले.

चौकट: 
स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या  विद्यार्थ्यांना शै. वर्ष २०२५-२०२६ मध्ये प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या तब्बल ४७३ पेक्षा जास्त संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अजूनही कांही कंपन्यांचे रिझल्ट्स येणे बाकी आहे. विद्यार्थ्यांची चिकाटी, स्वेरीची आदरयुक्त शिक्षणसंस्कृती, रात्र अभ्यासिका, विद्यार्थ्यांना दिले जाणारे विविध प्रकारचे प्रशिक्षण आदी बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये होणारी निवड होय.

Post a Comment

0 Comments