पंढरपूरच्या नूतन अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून प्रेरणा कट्टे यांची नियुक्ती..
पंढरपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय मंजूर झाल्यानंतर पंढरपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी लेडी सिंघम अधिकारी प्रेरणा कट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रेरणा कट्टे यांनी 2016 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी आजपर्यंत मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, कोल्हापूर, सातारा, अशा विविध ठिकाणी यशस्वी कामगिरी केली आहे.
प्रेरणा कट्टे यांनी यापूर्वी नवी मुंबई क्राइम ब्रांचची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. नवी मुंबई क्राईम ब्रँच ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. नवी मुंबईतील गुन्हेगारी वृत्ती बीमोड करण्याकरिता आणि महिला सक्षमीकरण करण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशेष मोहीम राबवली होती.
तसेच पुणे जिल्ह्यात काम करत असताना एसआयटी प्रमुख म्हणून कामकाज केले होते.

0 Comments