LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

न्यु सातारा कॉलेजमध्ये तीन दिवसीय इंडक्शन प्रोग्राम संपन्न


न्यु सातारा समूह संचलित, न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड पॉलीटेक्निक, कोर्टी येथे  प्रथम वर्षाच्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी "बिल्डिंग फ्युचर इंजिनिअर्स फॉर टुमारोज वर्ल्ड" या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन पुणे येथील बॅटोस आयटी सोल्युशन्स या नामांकित कंपनीच्या सहकार्याने करण्यात आले होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत यशस्वी व लाभदायी ठरला असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य श्री. विक्रम लोंढे यांनी दिली.

या इंडक्शन प्रोग्राममध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर आणि माहिती तंत्रज्ञान अशा सर्व शाखांच्या सुमारे 300 प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. औद्योगिक क्षेत्राची अपेक्षा, इंडस्ट्री 4.0 मधील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), ऑटोमेशन यांसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाची तसेच प्रत्येक अभियांत्रिकी शाखेतील करिअर संधींची सविस्तर माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.

बॅटोस आयटी सोल्युशन्स, पुणे येथील तज्ज्ञ प्रशिक्षक श्री. तन्मय पाटील (टेक्निकल सोल्युशन आर्किटेक्ट), श्री. पंकज बद्रायणी (टेक्निकल मॅनेजर), श्री. चिन्मय पाटील (सिस्टम आर्किटेक्ट) आणि श्री. हर्षद डांके (प्रिन्सिपल कन्सल्टंट) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोजगारक्षमता, सॉफ्ट स्किल्स, इंटर्नशिप संधी तसेच उद्योजकता याविषयीही सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य श्री. विक्रम लोंढे होते. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करून आपले भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी कॉलेजचे उपप्राचार्य श्री. विशाल बाड हेही उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा पुरेपूर फायदा करून घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजाराम निकम साहेब यांच्याकडूनही शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे समन्वयक श्री. इंद्रजीत जाधव यांनी या इंडक्शन प्रोग्रामच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच कॉलेजच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वी पार पडला.

Post a Comment

0 Comments