पंढरीत पद्मावती उद्यानाची शेजारी स्विमिंग टॅंक सुरू करण्यात आला आहे हा स्विमिंग टॅंक पूर्ण सुरक्षा व्यवस्थे अभावी एका पाठोपाठ एक बळी घेतले जात असल्याने हा पंढरीचा स्विमिंग टॅंक बनतोय मौत कुवां अशा आशयाचे निवेदन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष समीर कोळी व काँग्रेस पदाधिकारी यांनी दिले आहे.
पंढरपुरातील पद्मावती उद्यानाजी एक स्विमिंग टँक नगरपालिका व पंढरपूर येथील नेते मंडळींच्या आग्रा खातर मोठ्या हौसेने सुरू करण्यात आला पण पूर्ण सुरक्षेची काळजी घेण्यापूर्वी खूप मोठ्या थाटामाटा सुरू करण्यात आला असता स्विमिंग टॅंक सुरू होण्याच्या काही दिवसात पंढरीतील एक कॉलेज तरुण सुयोग संगीतराव याचा दुर्दैवी बळी गेला त्यानंतर हा स्विमिंग टॅंक काही वर्ष बंद ठेवण्यात आला पण पूर्ण चौकशी पूर्ण सुरक्षा व्यवस्था होण्यापूर्वीच काही अर्थपूर्ण राजकीय लागेबंध्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा स्विमिंग टॅंक संबंधित ठेकेदारास चालविण्यात दिला मात्र ठेकेदाराच्या बेफिकिरी मूळे हा स्विमिंग टॅंक चालू असताच या स्विमिंग टँक मध्ये २०२४ साली यश माने नावाच्या एका कॉलेज तरुणाचा बळी गेला असताना सुद्धा या घटनेची पूर्ण चौकशी होण्यापूर्वीच केस कोर्टामध्ये चालू असतानाही पुन्हा त्याच ठेकेदाराला ठेका का दिला जातो कोणाच्या आदेशाने कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या आशीर्वादाने अजून किती बळी घ्यायचे टेंडर या ठेकेदारास देणार असा प्रश्न पंढरीतील सामाजिक संघटनेसह पंढरीतील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
आता याच ठेकेदाराच्या काळात पंढरीतील या स्विमिंग टॅंक मध्येच या ऑगस्ट महिन्यात एक परप्रांतीय नरपत सिंग 21 वर्षे तरुणाचा बळी गेलेला आहे त्यामुळे हा पोहण्याचा टॅंक आहे की मौत का कुवा आहे अशा आशयाचे निवेदन सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग व काँग्रस कमिटी यांनी पंढरपूर नगरपालिके चे उपमुख्याधिकारी सूर्यवंशी साहेब यांच्या कडे दिले असून याची पूर्ण चौकशी करून ठेकेदार व लाइफ गार्ड तसेच या मधे सामील असलेल्या अधिकाऱ्यांची योग्य ती चौकशी करून कारवाई न झाल्यास काँग्रेस ओबीसी नगरपालिकेसमोर दि.०१/०९/२०२६ रोजी उपोषणास बसणार असल्याचे समीर कोळी यांनी म्हटले आहे.
या वेळी सोलापूर जिल्हा ओ.बी.सी अध्यक्ष समिर कोळी अल्पसंख्याक अध्यक्ष अश्पाक सय्यद जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ उराडे प्रा.अशोक डोळ सर युवक अध्यक्ष संदीप शिंदे समाज सेवक शिवाजीराजे धोत्रे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष शकील रतनपार्खी जेस्ट नेते मामा फलटणकर मा.सोशलमीडिया तालुका अध्यक्ष बाळासाहेब आसबे शहर अध्यक्ष महेश अधटराव व सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

0 Comments