LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीची एआयसीटीईच्या 'परम शवक' या उपक्रमासाठी निवड स्वेरी ठरली सोलापूर जिल्ह्यातील एकमेव संस्था



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)ची प्रतिष्ठित अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई- ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) 'परम शवक' या उपक्रमासाठी निवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 'परम शवक' सुपरकॉम्प्युटर मिळवणारी स्वेरी ही एकमेव संस्था ठरली आहे.
         परम शवक ही सी-डॅकने विकसित केलेली अत्याधुनिक सुपरकॉम्प्युटिंग प्रणाली असून ती कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा, वैज्ञानिक संगणन आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानातील शिक्षण व संशोधनासाठी विशेष उपयुक्त आहे. या सुविधेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांना अत्याधुनिक संगणकीय क्षमता उपलब्ध होणार असून कृत्रिम बुद्धिमत्तेवरील प्रकल्प, मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण, संशोधन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकासासाठी मोठी मदत होणार आहे तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळून उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास चालना मिळणार आहे. ही निवड स्वेरीच्या दर्जेदार तांत्रिक शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमाच्या सातत्यपूर्ण वाटचालीची पावती आहे. 'परम शवक' सुपरकॉम्प्युटरमुळे संस्थेच्या संशोधन क्षमतेत मोठी भर पडणार असून विद्यार्थी व संशोधकांसाठी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य बी.पी.रोंगे, अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.  

चौकट - बेंगलोर येथील सी-डॅक सोबत स्वेरीने सामंजस्य करार प्रस्थापित करून स्वेरी मध्ये सीटूएस स्कीम मधून ईडीए हे अद्ययावत डिझाईन सॉफ्टवेअर उपलब्ध करून घेण्यात यश मिळवले असून स्वेरीने सदर अद्ययावत सॉफ्टवेअर्स स्वेरीमध्ये उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने जुलै २०२४ मध्ये प्रस्ताव सादर केलेला होता. सुमारे एक कोटी पेक्षा जास्त एवढी मूळ किंमत असलेली ही अद्ययावत सॉफ्टवेअर्स स्वेरीला आता उपलब्ध झालेली आहेत. सीटूएस हे ‘चीप टू स्टार्ट अप’ चे संक्षिप्त रूप असून या स्कीमच्या  माध्यमातून  ईडीए टूल उपलब्ध झाले आहे ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना (व्हीएलएसआय) व एम्बेडेड डिझाइन बाबत अद्ययावत माहिती मिळते तसेच विद्यार्थी असे चीप डिझाईन्स बनवू शकतात. आजच्या युगात मोबाईल, टी.व्ही., लॅपटॉप अशा विविध उपकरणांमध्ये अशा चिप्स वापरल्या जातात. स्वेरी मध्ये पदवी, पदव्युत्तर अथवा पीएच.डी. चे शिक्षण घेणाऱ्या इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरींग तसेच आंतरविद्याशाखीय संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोजेक्ट्स मध्ये या सुविधांचा लाभ होणार आहे. सिनोप्सीस व  कॅडेन्स या कॅलीफोर्निया (अमेरिका) मधील बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून ही ईडीए सॉफ्टवेअर्स पुरवण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments