LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *दलितांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई नाही, दलितांवरील अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या राहुल गांधींवरच गुन्हा; भाजपचा दलितविरोधी चेहरा पुन्हा उघड — सोलापूर शहर काँग्रेसचा तीव्र निषेध*


सोलापूर, दि. ३१ ऑगस्ट २०२६ :

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर सभास्थळाचे गंगाजल शिंपडून कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच या प्रकरणाविरोधात आवाज उठविणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ, खासदार प्रणिती शिंदे व शहर अध्यक्ष  चेतनभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहर काँग्रेस कमिटी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने काँग्रेस भवन येथे भाजप व मोदी सरकारविरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

हल्द्वानी येथील या कथित ‘शुद्धीकरणा’ची घटना ही केवळ श्री. मल्लिकार्जुन खर्गे यांचा अपमान नसून, देशातील दलित, वंचित आणि बहुजन समाजाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचविणारी आहे. भारतीय संविधानाने समानता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये दिली असताना अशा प्रकारच्या जातीय भेदभावाच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, या घटनेविरोधात आवाज उठविणाऱ्या राहुल गांधी यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

यावेळी “दलितांचा अपमान करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो”, “राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या सरकारचा निषेध असो”, “दलितविरोधी नरेंद्र मोदी सरकारचा निषेध असो” अशा जोरदार घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दणाणून गेला.

यावेळी बोलताना काँग्रेसचे नगरसेवक नरसिंह आसादे म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि दलित नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळ ‘अपवित्र’ झाल्याच्या मानसिकतेतून त्याचे शुद्धीकरण करण्यात आले. या कृतीतून संपूर्ण दलित समाजाच्या स्वाभिमानाचा अपमान झाला आहे.
          या घटनेचा आवाज राहुल गांधी यांनी संसदेत आणि जनतेसमोर उठविला. जातीय भेदभाव व अस्पृश्यतेच्या विरोधात भूमिका घेत दोषींवर कारवाईची मागणी केली. मात्र, ज्यांनी दलितांचा अपमान केला त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी दलितांवरील अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या राहुल गांधी यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सूडबुद्धीची आणि दडपशाहीची मानसिकता दर्शविणारी असून काँग्रेस पक्ष त्याचा तीव्र निषेध करतो, असे नरसिंह आसादे यांनी सांगितले.
          भाजपकडून वारंवार दलित समाजाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, कार्याचा व योगदानाचा अपमान केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची दिशा दिली. अशा महामानवाच्या विचारांचा सन्मान करण्याऐवजी दलित समाजाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचविणाऱ्या घटना घडत असतील, तर त्या विरोधात काँग्रेस पक्ष ठामपणे आवाज उठवत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
           ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या भारतीय संविधानाने अस्पृश्यता नष्ट करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. त्यामुळे जातीय भेदभावाला प्रोत्साहन देणाऱ्या मानसिकतेविरोधात आवाज उठविणे हा गुन्हा ठरू शकत नाही. दलित समाजाच्या पाठीशी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून दलितांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही.
          अन्याय करणाऱ्यांना संरक्षण आणि अन्यायाविरोधात बोलणाऱ्यांवर गुन्हे, ही लोकशाहीची वाट नाही. FIR दाखल करून राहुल गांधी यांचा आवाज दाबता येणार नाही. राहुल गांधींचा आवाज हा देशातील कोट्यवधी शोषित, वंचित आणि बहुजनांच्या न्यायाच्या लढ्याचा आवाज आहे, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. भाजप-आरएसएसच्या मनुवादी विचारांना बळ देऊन देशात जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेला प्रोत्साहन देण्याचा कोणताही प्रयत्न काँग्रेस पक्ष आणि जागरूक जनता सहन करणार नाही. देश मनुवादी विचारांवर नव्हे, तर भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांवर चालतो, हे ठामपणे सांगत जातीयवाद आणि अस्पृश्यतेविरोधातील लढा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.
          अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहू, संविधानाच्या रक्षणासाठी लढत राहू आणि सामाजिक समतेसाठी संघर्ष करत राहू, असा निर्धार यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या आंदोलनात काँग्रेसचे नगरसेवक नरसिंह आसादे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, उदयशंकर चाकोते, परशुराम सतारेवाले, दिनेश म्हेत्रे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष सागर उबाळे, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापूरे, अशोक कलशेट्टी, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, अंबादास गुतीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, हरून शेख, हाजीमलंग नदाफ, संजय गायकवाड, विवेक कन्ना, सुबोध सुतकर, अँड करीमुनिसा बागवान, रेखा बिनेकर, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, शुभांगी लिंगराज, सचिन पवार, प्रतीक शिंगे, मोहसीन फुलारी, भीमराव शिंदे, रियाज अत्तार, शोभा बोबे, छाया हिरवटे, शिवाजी साळुंखे, व्यंकटेश बोमेन, शकूर शेख, अनिता भालेराव, मीना गायकवाड, चंद्रकला निजामल्लू, अभिषेक पवार, सुनील डोळसे, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments