LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*पंढरपूर शहरातील वार्ड क्र. १७ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न..* *नगराध्यक्षा, डॉ.सौ.प्राणिताताई भालके*

 

पंढरपूर शहरातील वार्ड क्र. 17  व 18  मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रम  पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.प्राणिताताई भगीरथ भालके  यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले . वेळी सर्व पंढरपूर नगर परिषदेचे नगरसेवक, कार्यकर्ते यांचेसह परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. 
 
पंढरपूर शहरातील वार्ड क्र. 17  व 18 मधील मधील अंतर्गत रास्ते, रमाई नगर येथील ड्रेनेज लाइन, तसेच या भागातील देवीच्या सभा मंडप या कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. नागरिकांना अधिक दर्जेदार व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रस्ते, गटारी, पायाभूत सुविधा तसेच अन्य विकासकामांचा   विकासाला नवी दिशा मिळणार असून नागरिकांचे जीवनमान अधिक उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे.
याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी विकासकामांबद्दल समाधान व्यक्त करत नगराध्यक्षा डॉ. प्राणिताताई भालके यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचे कौतुक केले. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत विकासाची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
*"जनतेचा विश्वास... विकासाचा ध्यास!"*

Post a Comment

0 Comments