प्रतिनिधी:
चार तरुणांचे बळी घेणाऱ्या पंढरीतील स्विमिंग टॅंकच्या
गलथान कारभारावर सोलापूर जिल्हा ओ.बी.सी काँग्रेसचे मा.अध्यक्ष समीर कोळी यांचे नेतृत्वात लाक्षणिक उपोषण केले असता योग्य त्या चौकशीनंतर दोषीवर कारवाई करण्याचे पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
पंढरीतील पद्मावती उद्यानानजीक एक स्विमिंग टॅंक असून त्या स्विमिंग टॅंक मध्ये आत्तापर्यंत 4 तरुणांचा बळी गेले असून 2024 मधे याच ठेकेदाराच्या कार्य काळात पहिला बळी गेला असता त्यासंबंधी काय चौकशी झाली ?काय कारवाई झाली ? याची जनतेला काही माहिती न देता योग्य त्या व्यवस्थे शिवाय पुन्हा स्विमिंग टॅंक कसा सुरू करण्यात आला आणि पहिला बळी गेला असताना सुद्धा त्याच ठेकेदाराला पुन्हा तो स्विमिंग टॅंक चालवण्यास कसा काय दिला गेला अशा या गलथान कारभारा च्या विरोधात सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी च्या वतीने मंगळवार दिनांक 1/ 9/ 2026 रोजी पंढरपूर नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण केले असता पंढरपूर नगरपालिकेने याची दखल घेत पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी उपोषण स्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. व संबंधित प्रकरणाचा एफ आय आर दाखल असून त्याचा क्रमांक 0 5 5 0 असा आहे हा एफ आय आर दिनांक 29/ 8/ 22 अन्वये दाखल केला असून संबंधीतांवर योग्य ती कारवाई केली जाईल ठेकेदारास ब्लैक लिस्ट करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले नंतर उपोषण मागे घेण्यात आले त्यानंतर वेळेत योग्य ते कारवाई न झाल्यास गणेश विसर्जनानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला
यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष हनूमंत मोरे जिल्हा उपाध्यक्ष नागेश गंगेकर, उपाध्यक्ष सुहास भाळवणकर,जिल्हा सचिव प्रा.अशोक डोळ सर,ओ बी सी अध्यक्ष मिलिंद अढवळकर,युवक अध्यक्ष संदीप शिंदे,समाजसेवक शिवाजीराजे धोत्रे,सोशल मीडिया तालुका अध्यक्ष देवानंद इरकल,सोशलमीडिया शहर अध्यक्ष महेश अधटराव, मा.तालुका अध्यक्ष बाळासाहेब आसबे,सायबू वाघमारे व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 Comments